Jun 26 2025 16:41:29   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये 'से नो टू प्लास्टिक' अभियान

डिजिटल पुणे    07-06-2025 15:47:36

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावर्षीची संकल्पना असलेल्या 'से नो टू प्लास्टिक' अंतर्गत सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी स्थापन ग्रीन क्लबच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक संकलन अभियानाचे आयोजन करत 'नो प्लास्टिक युज' चा नारा देण्यात आला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. विजय घारे, डॉ. अर्जुन डोके, युनिसेफच्या ग्रीन क्लब व प्लास्टिक संकलन अभियान समन्वयक डॉ. राणी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित या अभियानामध्ये सहभागी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार साहेब यांच्या पर्यावरण विषयक विचार व कार्यातून आदर्श घेत महाविद्यालय पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी कटीबद्ध असल्याचे नमूद केले.सदर प्लास्टिक संकलन अभियानामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी घरांमधील दुधाच्या पिशव्या, प्लास्टिक बॅाटल्स, प्लास्टिक आवरण व इतर प्लास्टिक टाकाऊ पदार्थ असा एकूण २८ किलो प्लास्टिक जमा करुन पुढील प्रक्रियेसाठी तो सागरमित्र आभियान, पुणे या पर्यावरणवादी स्वंयसेवी संस्थेकडे जमा करण्यात आला.

याकरिता कमिन्स ग्रुप, इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.पर्यावरण संवर्धनासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत असल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांनी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले आहे.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. मनीषा शेवाळे, प्रा. अनंत पवार, डॉ. विजय घाडगे, डॉ. विद्या पाठारे, प्रा. तनुजा तारु, प्रा. वनीता शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती