सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 विश्लेषण

गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी पुणे सज्ज! वाहतुकीत मोठा बदल, शहरातील १७ मुख्य रस्ते राहणार बंद

डिजिटल पुणे    16-09-2024 14:45:36

पुणे : पुण्यात गणपती विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पुण्याच्या मध्य भागातील प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. तर मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरीकांना विसर्जन काळात नेमक्या कोणत्या रस्त्याने जाता येणार आहे? तसेच कोणते १७ रस्ते बंद राहणार आहेत? हे जाणून घेऊयात

पुण्यात विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी १७ सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास सूरूवात होणार आहे. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास सुरुवात होईल. प्रथम मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतील. त्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची मिरवणूक निघेल. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहील. 

पार्किंगची व्यवस्था कुठे?

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी अन् चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी अन् चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी अन् चारचाकी)

पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त

गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे...मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती