सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 विश्लेषण

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आता पुणे पोलीस देखील सज्ज; संशयितांच्या हालचालींवर कॅमेऱ्यांची करडी नजर

डिजिटल पुणे    16-09-2024 16:04:12

पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सवाला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. मानाचे पाच गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती आणि गणपती मंडळे व त्यांचे सजीव देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पुण्यनगरीत येत असतात. पुण्यातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्व आहे. सांस्कृतिक, पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशाची विसर्जन मिरवणूक काढली जाते. दरम्यान १७ तारखेला विसर्जन मिरवणूक होणार आहे. यासाठी आता पुणे पोलीस देखील सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीत पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळणार आहे.

पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (१७ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. यानिमित्ताने पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन सोहळ्यासाठी ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सकाळी ७ पासून बंदोबस्त सुरू होणार असून, तो मिरवणुकीची सांगता होईपर्यंत तैनात असणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. शहर व उपनगरात बंदोबस्त असणार असून, मुख्य मिरवणूकीसाठी अतिरीक्त बंदोबस्त ठेवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

छेडछाड व चोरट्यांसाठी साध्या वेशातील पोलीस

विसर्जन मिरवणूकीत तुडूंब गर्दी होते. गर्दीत दागिने, मोबाईल तसेच पाकिट मारणाऱ्या चोरट्यांचा देखील सुळसूळाट असतो. हे चोरटे यादिवशी मोठ्या प्रमाणात चोऱ्या करतात. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. तसेच नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार असून, विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (१७ सप्टेंबर) रात्री बारापर्यंत ध्नवीवर्धक वापरण्यास परवानगी दिली आहे. ध्वनीप्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

– जी. श्रीधर, पोलीस उपायुक्त विशेष शाखा

असा आहे बंदोबस्त

 

अप्पर पोलीस आयुक्त– ४

पोलीस उपायुक्त– १०

सहाय्यक पोलीस आयुक्त– २५

पोलीस निरीक्षक– १३६

पोलीस उपनिरीक्षक– ६५३

पोलीस अंमलदार– ५ हजार ७००

एसआरपीएफ कंपनी– १

होमगार्ड– ४००


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती