सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 विश्लेषण

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमीचे काम निकृष्ट दर्जाचे; ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेची मागणी

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    18-09-2024 17:55:04

उरण : उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमीचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर स्मशान भूमीचे काम थांबवावे व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.स्मशान भूमीचे काम करताना कोणतेही योग्य ते नियोजन नाही तसेच योग्य ते मटेरियल वापरले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

स्मशान भूमीचे काम चालू होते. मात्र काम चालू असताना कॉलम चा प्रॉब्लेम झाला आहे. काम अधिक चांगले व व्यवस्थित होण्यासाठी सदर स्मशान भूमीचे काम थांबविले आहे. सदर कामाची पाहणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. पाहणी केल्या नंतर सदरचे काम थांबविण्यात आले आहे.तसे सूचना ठेकेदारलाही देण्यात आले आहेत.

  - राम म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी, केगाव ग्रामपंचायत


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती