सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती मतदान

डिजिटल पुणे    20-11-2024 18:07:02

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. वादाच्या काही तुरळक घटना सोडता जनतेने घराबाहेर पडत मतदानाचा आपला हक्क बजावला.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 4 हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर -  ६१.९५टक्के,

अकोला - ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८  टक्के, 

औरंगाबाद- ६०.८३ टक्के, 

बीड - ६०.६२ टक्के, 

भंडारा- ६५.८८ टक्के, 

बुलढाणा-६२.८४  टक्के, 

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे - ५९.७५ टक्के, 

गडचिरोली-६९.६३ टक्के, 

गोंदिया -६५.०९  टक्के, 

हिंगोली - ६१.१८ टक्के, 

जळगाव - ५४.६९ टक्के, 

जालना- ६४.१७ टक्के, 

कोल्हापूर-  ६७.९७ टक्के,

लातूर _ ६१.४३ टक्के, 

मुंबई शहर- ४९.०७ टक्के, 

मुंबई उपनगर-५१.७६  टक्के,

नागपूर - ५६.०६ टक्के,

नांदेड -  ५५.८८ टक्के, 

नंदुरबार- ६३.७२  टक्के,

नाशिक -५९.८५  टक्के, 

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, 

पालघर- ५९.३१ टक्के, 

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे -  ५४.०९ टक्के,

रायगड -  ६१.०१ टक्के, 

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली - ६३.२८ टक्के,

सातारा - ६४.१६ टक्के, 

सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे - ४९.७६ टक्के, 

वर्धा -  ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२  टक्के,

यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

पुणे जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 54.09  टक्के मतदान.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील दुपारी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी.

 वडगाव शेरी 50.46  टक्के.

 शिवाजीनगर 44.95 टक्के.

 कोथरूड  47.42 टक्के.

 खडकवासला 51.56  टक्के.

 पर्वती  48.65 टक्के.

 हडपसर 45.02   टक्के.

 पुणे कॅन्टोन्मेंट  47.83 टक्के.

 कसबा पेठ 54.91 टक्के.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती