पुणेः मतदान संपताच खडकवासला मतदारसंघाचे मविआचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत मोठी मिरवणूक काढली. दोडकेंची मिरवणूक सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
खडकवासला मतदारसंघाचे मविआचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत मोठी मिरवणूक काढली. दोडकेंची मिरवणूक सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
खडकवासला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर, मनसेचे उमेदवार मयुरेश रमेश वांजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दोडके सचिन यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. मात्र, निकालाआधी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढली आहे. मात्र, राज्यातील 288 मतदारसंघातील उमेदवारांसह नागरिकांचं लक्ष्य निकालाकडे लागलं आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत.