मुंबई : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अमेरिकेत मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन न्यायालयात गुंतवणूकदारांची फसवणूक आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अदानी समूहाने या आरोपांना निराधार म्हणत सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. समूहाने पारदर्शकता आणि कायद्याचं पालन करण्याची हमी दिली आहे. आरोपांनुसार, अदानी समूहाने कंत्राटे मिळवण्यासाठी लाच दिली असून, यासाठी सागर अदानी यांनी फोनचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.
हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदानी उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर आथा पुन्हा एकदा अदानी उद्योग समूहाला पुन्हा एकदा गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्स्चेंज कमीशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकी गुंतवणूकदारांची फसवणूक करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात आदानी यांचे भाचे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी तसेच एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवरही आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर आता अदानी उद्योग समूहाने मोठा निर्णय घेतला आहे.
अदानी ग्रुपने नेमका काय निर्णय घेतला?
अदानी उद्योग समूहाच्या उपकंपन्यांनी 600 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे बॉण्ड जारी करण्याची प्रस्तावित योजना रद्द केली आहे. अदानी उद्योग समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिस तसेच युनायटेड स्टेस्स सिक्योरिटिज अँड एक्स्चेंज कमिशनने अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी तसेच त्यांच भाचे सागर अदानी यांच्याविरोधात लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप केले आहेत. याच आरोपांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
गौतम अदानी यांच्यावर नेमका आरोप काय?
भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षांत साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता. तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी 3 अब्ज डॉलर्स किमतिचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, अदानी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड आली आहे. अदानी उद्योग समूहाच्या चार कंपन्यांना लोअर सर्किट लागले आहे. तर इतरही कंपन्यांच्या शेअर्समध्ये 10 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.