मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदानींचे नाव पुढे घेतले जाते. मात्र गौतम आदानी हे सध्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. कारण गौतम अदानीच्या विरोधात फसवणूक आणि आणि लाचखोरी प्रकरणी अमेरिकेतील फेडरल कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय सुनावला असतानाच आता देशातील सर्वात श्रीमंत उद्योग समूह अशी ओळख असलेल्या आदानी ग्रुपमध्ये आणखी एक मोठा भूकंप झाला आहे. आदानींच्या आलेल्या बातमीनंतर शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. या बातमीनंतर आदानी ग्रुपचे शेअर सर्रर्रर्रकन घसरले. इथे शेअर निश्चांकी स्तर गाठत असतानाच कंपनी पुढे आणखी अनेक आव्हान उभे राहिले आहेत.
NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या वतीने या गटात येणाऱ्या अनेक कंपन्यांनी आता अमेरिकेतून झालेल्या दोषारोपण 2.45 लाख कोटी कुठं घालवले या संदर्भात अदानींकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. गुरुवारी कार्पोरेट अनाउन्समेंटच्या माध्यमातून अंबुजा सिमेंट, अदानी टोटल गॅस लिमिटेड, अदानी पावर, एसीसी लिमिटेड, अदानी विल्मार, एनडीटीवी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी अदानी स्पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनोमिक झोनला पुन्हा पडताळणी संदर्भात नोटीस जारी केली आहे.
दरम्यान सदर प्रकरण समोर येताच अदानी समूहाचा मार्केट कॅप जवळपास 2.45 लाख कोटी रुपयांनी कोसळला थोडक्यात सुरुवातीच्या दोन दिवसात आत्ताच अडीच लाख कोटी रुपये बुडाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील मुख्य कंपनी असणाऱ्या Adani Energt solutions मध्ये 20% अदानी ग्रीन एनर्जी मध्ये 19.53% आणि आदाने टोटल गॅस मध्ये 18.14% इतकी घट झाली आहे.