अहिल्यानगर : श्रीलंका सरकारने 30 टक्क्यांवरून आयात शुल्क 10 टक्के केल्याने या देशात कांदा निर्यात वाढणार आहे. त्यामुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकसह देशातील सुमारे 9 टक्के कांदा श्रीलंकामध्ये होतो. श्रीलंकेने आयात शुल्क कमी केल्याने निर्यातदारांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत जाऊ शकेल. शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना श्रीलंकन सरकारच्या या निर्णयाचा सर्वांत मोठा फायदा होईल. देशातून जितका कांदा निर्यात होतो, त्यातील नऊ टक्के कांदा श्रीलंकेत जातो. बांगलादेशनंतर भारताचा सर्वांत मोठा कांदा निर्यातदार देश श्रीलंका आहे.
येणार्या काळात कांदा आवक वाढण्याची शक्यता असून केंद्र सरकारने 20% असलेला कांदा निर्यात दर देखील रद्द करण्याची कांदा उत्पादक संघटना मागणी करत आहे. बांगलादेश भारतातून सर्वाधिक कांदा आयात करतो. यानंतर श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, मॉरिशस आणि भूतानचा क्रमांक लागतो.