सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

मोठी बातमी : अखेर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी ला शरण येणार; सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

डिजिटल पुणे    31-12-2024 12:40:46

पुणे : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. याचदरम्यान बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड  यांना 29 डिसेंबरच्या रात्रीच पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाहीय, असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता अचानक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

वाल्मिक कराड हे फरार आहेत. ते पोलिसांना सोमवार किंवा मंगळवारी शरण येतील अशी चर्चा होती. अद्याप वामीक कराड यांनी पोलिसांना शरण आलेले नाही. आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुण्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल. वाल्मीक कराड सीआयडीला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सीआयडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आज वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण येणार असल्याने सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच शरण येण्याआधी वाल्मिक कराडने एक व्हिडीओ पोस्ट करत त्यामध्ये मी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण जाणार आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना माझ्यावर राजकीय द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. सरपंच संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्याप्रकरणात माझा सहभाग असल्यास न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती मान्य असेल, असे त्यांनी म्हटले होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती