सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

मध्यप्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; सिमेंट फॅक्टरीत स्लॅब कोसळून 3 जण ठार; 50 जखमी

डिजिटल पुणे    30-01-2025 16:20:59

मध्यप्रदेश: मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पन्ना जिल्ह्यात असणाऱ्या एक सीमेंट फॅक्टरीमध्ये स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत. पन्ना जिल्ह्यातील सिमेंट फॅक्टरीमध्ये स्लॅबचे काम सुरू होते. दरम्यान यावेळेस स्लॅब पडल्याने 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत.

दरम्यान दुर्घटनेची माहिती होताच, बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून, रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू करण्यात आले आहे. ढीगाऱ्याखाली अडकेलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी झालेल्या लोकांना जिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आजूबाजूच्या तालुक्यांमधील रेस्क्यू ऑपरेशन करणारी पथके  दुर्घटनेच्या ठिकाणी दाखल झाली आहेत.

”मध्यप्रदेश भाजपचे अध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, पन्ना येथील जेके सिमेंट प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. काही जणांचा मृत्यू झाला आहे. ही वेदनादायी बाब आहे. प्रशासनाशी संपर्क करून संपूर्ण माहिती घेतली आहे. मृतांच्या आत्म्यांना शांती आणि जखमींच्या आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”

कारखान्याची चिमणी कोसळल्याने ९ कामगारांचा मृत्यू

छत्तीसगडच्या मुंगेली या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली. एका प्रकल्पाची चिमणी पडल्याने त्याच्याखाली अनेक कामगार अडकले होते. दरम्यान ही दुर्घटना घडताच तातडीने त्या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले. या घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 25 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले होते. कारखान्याची चिमणी कोसळल्याने 25 पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. दरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला . मात्र मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. जखमी कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती