सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या सविस्तर

डिजिटल पुणे    01-02-2025 17:11:20

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प मांडताना, त्यांनी गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करताना, “धनधान्य योजना” सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025  मध्ये अनेक वस्तू स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहेत, कारण त्यावरील करात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ई-वाहने खरेदी करणे अधिक परवडणारे होईल. बजेटमधील सवलतीमुळे ग्राहकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळणार आहेत.

काय स्वस्त होणार?

कॅन्सरवरील 36 औषधे

मेडिकल उपकरणे

LED दिवे

भारत निर्मित कपडे

मोबाइल फोन बॅटरी

82 वस्तूंवरील सेस हटवण्यात आला

लेदर जॅकेट

शूज, बेल्ट आणि पर्स

इलेक्ट्रिक वाहने (EVs)

LCD आणि LED टीव्ही

हॅंडलूम फॅब्रिक्स

काय होणार महाग ?

इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ

अर्थसंकल्पात घरं महागणार आहेत.

फॅबरिक

आयात केलेल्या मोटारसायकली, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट्स, पॅनेल डिस्प्ले आणि प्रीमियम टीव्ही महाग होणार

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेता डॉक्टर्सची संख्या सुद्धा वाढेल.

आयआयटीच्या 6500 जागा वाढवण्यात येणार आहेत.

देशात 3 AI एक्सल्स सेंटर उभारणार.

डाळींमध्ये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न 

डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार 6 वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार. तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती