सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

भगवे वस्त्र, हातात रुद्राक्षाची माळ आणि मंत्रोच्चार!! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गंगेत पवित्र स्नान

डिजिटल पुणे    05-02-2025 14:44:27

प्रयागराज:  प्रयागराजमध्ये  सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याला संपूर्ण जगभरातील मोठंमोठ्या लोकांनी हजेरी लावली आहे. आज या महाकुंभ मेळ्यात हजेरी लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माघ अष्टमीच्या शुभदिनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. भगवे वस्त्र परिधान करून, गळ्यात व हातात रुद्राक्षाची माळ घालून मोदींनी या धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला. स्नानपूर्वी त्यांनी गंगा नदीची विधीवत पूजा केली आणि मंत्रोच्चाराच्या करत गंगेत स्नान केले.

पंतप्रधान मोदींच्या पवित्र स्नानामुळे महाकुंभाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणखीन अधोरेखित झाले आहे. मात्र, या मेळाव्यात पंतप्रधानांनी दाखवलेला सहभाग धार्मिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. महाकुंभ हा हिंदू धर्मातील एक पवित्र धार्मिक सोहळा आहे, जो लाखो भाविकांना आपल्याकडे आकर्षित करतो. यंदाचा महाकुंभ १३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू झाला आहे. या सोहळ्यात आज नरेंद्र मोदी यांनी देखील सहभाग नोंदवला.

माघ अष्टमी: शुभ दिवसाचे महत्त्व 

सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचे मेळाव्यातील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे मोदींनी पवित्र स्नानासाठी ५ फेब्रुवारी हा दिवस का निवडला, हा प्रश्न विचारला जात आहे. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘माघ अष्टमी’. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील आठवा दिवस हा ध्यान, दानधर्म, तपश्चर्या आणि स्नानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्याने आध्यात्मिक शुद्धी मिळते, असे धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस मोदींनी निवडला असल्याचे म्हणले जात आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती