सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात अघोषित पाणीकपात,विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
 विश्लेषण

14 फेब्रुवारी: पुलवामा हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण ;भारतासाठी काळा दिवस म्हणून ओळखला जाणारा पुलवामा शहिद हल्ला

डिजिटल पुणे    14-02-2025 17:29:11

मुंबई : 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, पण भारताच्या इतिहासात हा 'काळा दिवस' आहे. 2019 मध्ये याच दिवशी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले, तर अनेक जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारताने 12 दिवसांत बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ला करून सुमारे 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

पुलवामा येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१९ मध्ये श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर २,५०० हून अधिक सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ७८ वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी हल्लेखोराने हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान मृत्युमुखी पडले होते. तर ३५ हून अधिक जखमी झाले होते. हा इतिहासातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता. या हल्ल्याने देशाला हादरवून टाकले होते.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-कश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा मोठा ताफा श्रीनगरच्या दिशेने जात होता. अवंतीपोरा येथील गोरीपोरा भागाजवळ पोहोचताच, एका अज्ञात वाहनाने ताफ्यातील एका बसजवळ संशयास्पद हालचाल सुरू केली. सुरक्षा दलाने त्याला दूर राहण्याचे वारंवार आदेश दिले, परंतु वाहनाने ते आदेश धुडकावले. काही क्षणांतच, 200 किलो RDX ने भरलेल्या त्या वाहनाने बसला जोरदार धडक दिली आणि भीषण स्फोट झाला. या भयंकर हल्ल्यात 40 वीर जवान शहीद झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. CRPFच्या ताफ्यात तब्बल 60 हून अधिक वाहने आणि 2,547 जवान होते, त्यामुळे हा हल्ला अत्यंत विध्वंसक ठरला.

जेईएमने घेतली होती जबाबदारी

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (जेईएम) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. बारा दिवसांनंतर २६ फेब्रुवारी रोजी उशिरा भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यात अनेक अतिरेकी ठार मारले होते.पुलवामा हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भयंकर दहशतवादी हल्ला ठरला. या क्रूरतेने संपूर्ण भारताला एकत्र आणले आणि देशाने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली. या हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने (IAF) 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उध्वस्त केलं.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती