सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

महाराष्ट्राच्या ज्युनियर्सना रौप्यपदक - 3-1 अशा आघाडीनंतरही मुलांच्या संघाचा पराभव; मुलींचा संघ शूटआउटमध्ये पराभूत

डिजिटल पुणे    02-08-2024 16:10:05

पुणे: राजनांदगाव (छत्तीसगड) येथे झालेल्या दुसर्‍या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष आणि महिला विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळाले. अंतिम फेरीत मुले संघाचा हॉकी मध्य प्रदेशकडून 4-6 असा तर मुलींच्या संघाला नियोजित वेळेत 2-2 अशा बरोबरीनंतर शूटआउटमध्ये मध्य प्रदेशकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला.

मध्य प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राच्या मुलांनी चांगली कामगिरी केली. सुभान आबिदने (11व्या) पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करताना मध्य प्रदेशला आघाडीवर नेले तरी अर्जुन हरगुडेचे (17वा, 21वा)  आणि कार्तिक पठारेच्या(22वे) गोलच्या जोरावर महाराष्ट्राने पूर्वार्धात 3-1 अशी आघाडी घेतली होती.

मात्र, मध्यंतरानंतर रितेंद्र सिंगच्या (50वा, 56वा) दोन अप्रतिम गोलमुळे मध्य प्रदेशने 3-3 अशी बरोबरी साधली. सूर गवसलेल्या प्रतिस्पर्धी संघाने आनंद यादव (55वा), तुषार परमार (58वा) आणि विवेक पाल (60वा) यांच्यामुळे एकूण आघाडी 6-3 अशी वाढवली. हीच आघाडी निर्णायक ठरली.

महाराष्ट्राच्या संतोष बिराजदारने (57व्या) पेनल्टी स्ट्रोकवर गोल करताना मध्य प्रदेशची आघाडी थोडी कमी केली.

महिलांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशकडून नियोजित वेळेत प्रत्येकी दोन गोलांची नोंद झाली. चानू खैदेम शिलेमा (22व्या) आणि पलक गुप्ताने (23व्या) यांनी पेनल्टी कॉर्नरवर आपल्या टीमला आघाडीवर नेले. ज्युथिका बोडखे (40व्या) आणि झेड लालदिंतलुआंगीने(54व्या) पेनल्टी कॉर्नरद्वारे अचूक गोल करताना 2-2 अशी बरोबरी साधली.

पेनल्टी शूटआउटमध्ये मध्य प्रदेशकडून काजल, चानू शैलिमा, हुदा खानने गोल केले. महाराष्ट्राकडून आकांशा पाल आणि तनुश्री कडू यांनाच गोल करता आले.

निकाल -

ज्युनियर:

मुले

हॉकी महाराष्ट्र: 4(अर्जुन हरगुडे 17’, 21’; कार्तिक पठारे 22’; संतोष बिराजदार 57’ - पीएस) पराभूत वि. हॉकी मध्य प्रदेश: 6(सुभान आबिद 11’ - पीसी; रितेंद्र सिंग 50’, 56’; आनंद यादव 55’; तुषार परमार 58’; विवेक पाल 60’). हाफटाईम: 3-1

मुली

हॉकी मध्य प्रदेश: 2 (3) (चानू खैदेम शिलेमा 22’ - पीसी; पलक गुप्ता 23’ - पीसी; काजल, चानू शैलिमा, हुदा खान - पेनल्टी शूटआउट) विजयी वि. हॉकी महाराष्ट्र: 2 (2) (ज्युथिका बोडखे 40’; झेड लालदिंतलुंगी 54’ - पीसी; आकांशा पाल, तनुश्री कडू - पेनल्टी शूटआउट).


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती