सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

सरप्राईज!! 'बिग बॉस मराठी' नवा सिझन येतोय; महेश मांजरेकर नव्हे तर 'हा' अभिनेता सांभाळणार होस्टिंगची सूत्र

डिजिटल पुणे    21-05-2024 15:42:01

 पुणे : संपूर्ण महाराष्ट्र गेली २ वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता अखेर तो क्षण आता जवळ आला आहे. रिऍलिटी शोचा बाप अर्थात बिग बॉस मराठीच्या नव्या सिजनची घोषणा झाली आहे. कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच बिग बॉस मराठीच्या आगामी सिजनचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मुख्य म्हणजे यावेळी शोच्या होस्टचा चेहरा बदलला आहे.

बिग बॉस मराठीचा होस्ट बदलला

आतापर्यंत बिग बॉस मराठी या शोचे होस्टिंग दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले आहे.रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता , अवघ्या महाराष्ट्राचाच नाहीतर जगभरातील मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत असलेला “लय भारी” स्टार रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टायलिश हिरो आणि रसिकांना ‘वेड’ लावणारा मराठमोळा मुलगा रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये रितेश देशमुखबरोबरच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझननी मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जगभर जोरदार चर्चा झाली. आता त्याच सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या “बिग बॅास मराठी” च्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.

पहिला प्रोमो आऊट 

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या प्रोमोमध्ये रितेशच्या तोंडी एकही डायलॉग नसला तरी त्याची स्टाईल कातिलाना आहे.

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आता आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या आलिशान घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप्स अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती