सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी व्हॅक्टरची चोरट्यांनी गोळ्या झाडून केली हत्या

डिजिटल पुणे    27-05-2024 16:06:20

लॉस एंजेलिस : हॉलीवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी व्हॅक्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये ही घटना घडलीय. चोरट्यांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. गोळ्या मारल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. काही चोरट्यांनी जॉनीच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न केलं. जॉनीनं ते पाहिलं आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चोरांनीं जॉनीला गोळ्या घालून ठार केलं. जॉनीची आई स्कारलेटने याची माहिती दिलीय..जॉन फक्त ३७ वर्षांचा होता. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. जॉनीच्या मृत्यूनंतर हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्तानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेता जॉनी व्हॅक्टरवर २५ मे रोजी हल्ला झाला. अभिनेत्याची आई स्कारलेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनीवर शनिवारी पहाटे तीन वाजता हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. जॉनीच्या आईने सांगितलं की चोर त्याच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते. जॉनीने चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र तरीही चोरट्यांनी त्याला गोळ्या घातल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे.

जॉनीबरोबर काम करणारी सहअभिनेत्री सोफिया मॅटसन हिने अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सोफियाला जॉनीच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली. जॉनी ‘जनरल हॉस्पिटल’मधील ब्रँडो कॉर्बिनच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. २०० हून अधिक एपिसोड असलेल्या या शोमध्ये जॉनीने ड्रग ॲडिक्ट साशाच्या पतीची भूमिका साकारली होती. २०२२ मध्ये त्याने हा शो सोडला होता. ‘जनरल हॉस्पिटल’ च्या टीमनेही पोस्ट करून जॉनीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘जनरल हॉस्पिटल’ व्यतिरिक्त तो ‘स्टेशन १९’, ‘वेस्टवर्ल्ड’ आणि ‘कॉल ऑफ ड्यूटी: व्हॅनगार्ड’मध्ये देखील दिसला होता.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती