सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची, पुणे, सौ राधिका जोशी यांनी सांगितला लग्नाच्या २८ वर्षाच्या प्रवास

डिजिटल पुणे    06-06-2024 16:19:15

 मधुर मिलन दोन जीवांचं...

 स्नेहबंधन दोन कुटुंबांचा कधी अबोल याचा रंग कधी प्राजक्ताचा चांदण..

 कधी विरहाची तगम कधी सहवास देणे कधी खटक्यांचा खमंग तडका कधी वाघबानांचा कळवायच्या लग्न...

परस्परांचा अतूट विश्वास सामंजस्य बांधिलकी जबाबदारी उदंड प्रेम आणि तेवढीच तडजोड... 

२८ वर्षाच्या आमच्या सहवासात मला उलगडलेली ही लग्नाची व्याख्या, पाहण्या - बिहण्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरलं होतं.  आम्ही दोघेही अभियांत्रिकीचे पदवीधर अर्थातच वेगवेगळ्या कॉलेजेस आणि बॅगचे तो अभ्यासक्रम कसा बसा डोक्यात शिरण्याच्या प्रयत्नात कॉलेजमध्ये इकडे तिकडे बघायला कुठला वेळ मिळणार परिणामी, त्या फुलपाखरी कॉलेज विश्वास आम्ही दोघेही सिंगलच राहिलो होतो.

आमच्या नात्यातल्या एका मामीकडे इच्छुक उमेदवारांची यादी असायची निशुल्क मॅरेज ब्युरो च म्हणतात ना मी आणि आई एकदा सहज तिच्याकडे गेलो  असताना.  तिने मला एक वही दिली आणि सांगितलं यातली तुला ज्या मुलांची माहिती बरी वाटेल त्यांची नावे, पत्ते, आणि फोन नंबर लिहून घे.  हळूहळू बघायला सुरुवात करू एक-दोन  छानसे फोटो काढून ठेव.  पत्रिका आहेस तुझी खरं तर मी लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टीचा अजिबात गांभीर्याने विचार केला नव्हता.  आत्ताशी जरा त्या किस्काटा अभ्यासक्रम मधून सुट्टीचा श्वास घेत होते.  पहिल्या जॉबला जेमतेम सहा महिने होत होते.  लगेच कुठल्या नवीन बंधनात अडकला मन राजे नव्हतं.  मग ते बंधन अगदी रेशमी का असेना पण आई आणि त्या मामी दोघींनी मला अगदी भरीलाच पाडलं आता बघायला सुरुवात केली की दोन वर्ष सहज जातील असा अगदी ठासून सांगितल्यामुळे माझा नाईलाज झाला.

मी तिच्या वहीतल्या मुलांची यादी बघायला लागले.  या यादीतल्या एखाद्या मुलाबरोबर पुढचं संपूर्ण आयुष्य आपल्याला व्यतित करायचे आहे.  असं त्यावेळी वाटलेही नव्हतं.  21 वय असून असून किती प्रगल्भता असणार खरं सांगायचं तर फारशी नव्हतीस त्यामुळे एकूणच कामे स्वप्न वृत्तीचा मनावर पगडा होता.  लग्न म्हणजे छान छान कपडे घालून गाडीवर वाऱ्याच्या वेगाने फिरायचं नाटक सिनेमा बघायचे नवपरिणीत जोडपं म्हणून सगळ्यांकडून लाड करून घ्यायचे असं काही सचित्र माझ्या डोळ्यासमोर होतं त्यामुळे नावांची लिस्ट करायला काय हरकत आहे.  असा विचार करून विवाहित बघायला लागले.  चार पाच नाव शॉर्टलिस्ट केली.  दिलीप सतीश अशा नावांची यादीत राजच हे मला वेगळं आणि जरा कलात्मक वगैरे वाटलं मग मी ते नाव सर्व पहिलं पाहिलं.  नावात काय असतं याचा साक्षात्कार मला थोडे दिवसांनी आला तो भाग वेगळा पण तेव्हा एवढा विचार कुठला सुचवायला?

घरी आल्यावर वडिलांच्या कानावर ही बातमी घातली एवढी घाई काय आहे.  अशी त्यांची प्रतिक्रिया होती.  त्यावर आईने काही बाई सांगून त्यांना कसं कसं राजी केलं.  आता पहिली पत्रिका मुलाकडे पोहोचवायची होती.  ती थोडीफार जोडली.  तर आमच्या पुढच्या रेशीमगाठी जुळायची शक्यता होती.  माझं लग्न फोटो  काही मी काढणार होता.  माझी एक आपली समजत आहे.  की कॅमेराला माझा सौंदर्य टिकता येत नसेल.  त्यामुळे माझे फोटो अजिबात चांगले येत नाहीत.  मग कॉलेजमधला अजून तीन मैत्रिणीबरोबर चा फोटो मी पत्रिकेबरोबर पाठवायचा ठरवलं. आम्हा चौघीमधली जी पसंत पडेल.  तिने ठेवला होता मला असं वाटतं फोटो नाही आवडला, तर काहीतरी कारण पुढे करण्यासाठी म्हणून पत्रिकेचा आधार घेत असावेत पत्रिका जुळत नाही असं सांगितलं की कोणाचं मन दुखावलं जात नाही.  नाहीतर पत्रिकेतली अगदी छत्तीस गुण जुळले.  तरी संस्था सुखासोबत होत असं नाही त्यासाठी मन जुळून आणि ती सांभाळणे हे जास्त महत्त्वाचा आहे नाही का.

तर माझ्या एका आत्या बहिणीने माझी पत्रिका त्यांच्याकडे जाऊन सुपूर्त केली.  तीन-चार दिवसात पत्रिका जुळत असल्याचा फोन आला.  म्हणजे बहुतेक फोटो पसंत पडला असावा.  दोघींमध्ये नक्की कोण पसंत पडली.  हे गुलदस्ताचं होतं मग दोनच दिवसात ऑफिसमध्ये मला आईचा फोन आला.  की संध्याकाळी वेळेवर घरी ये मुलांचे आई-वडील मला पाहायला येणार होते.  पाच वाजता ऑफिस सुटायचं पण बरेचदा जास्तीचे काम निघायचं.  आणि थांबावं लागायच तिच्या सूचनेप्रमाणे मी त्या दिवशी मात्र ऑफिस सुटल्यावर लगेच घरी आले.  जेमतेम चहा पिऊन होईपर्यंत ती दोघं आलीच कसाबसा चेहरा फक्त धुतला होता बाकी नटायला वगैरे वेळ नव्हता आणि खरं सांगायचं तर मनाची तेवढी तयारीही नव्हती.  अतिशय कॅज्युअली मी या एकूणच प्रकाराकडे बघत होते.  लगेच लग्न जमेल किंबहुना ते जमाव असे वार वाटत नव्हतं कदाचित त्यामुळेच असेल पण माझ्यावर कुठलंही दडपण वगैरे आलेलं  मला जाणवलं नाही.

जुजबी प्रश्न उत्तर झाली.  वधु परीक्षा म्हणतात ती हीच असावी एकंदरीत परीक्षेचा पेपर सोपा होता.  मग दोन दिवसांनी त्यांच्या घरी बघण्याचा कार्यक्रम सुनिश्चित झाला.  आता आम्ही दोघं प्रत्येक्ष एकमेकांना बघणार होते.  नंतरच्य वैवाहिक आयुष्यात बघून घेईन असं म्हणण्याचे प्रसंग भलेही आले असतील.  पण हे बघ ना जरासं वेगळं होतं.  माझा कसा का असेना पण एक फोटो मी पाठवला होता . मला मात्र मुलगा कसा आहे.  हे अजिबात माहिती नव्हतं त्यामुळे बघणं हे माझ्यासाठी गरजेचं होतं.

लग्नाविषयी फार जास्त विचार करायला पुरेसा वेळ मिळालाच नव्हता.  पण काहीतरी हटके रोमांचक पद्धतीने लग्न करावं.  असं मला वाटत होतं हिंदी सिनेमाचा प्रभाव दुसरं काय मात्र खऱ्या आयुष्यात असं काही घडत नसतं.  हे लवकरच माझ्या लक्षात आलं होतं.  आणि तो विचार मनातून काढून टाकून मी या सगळ्या पारंपरिक प्रथेसाठी मानसिक दृष्ट्या तयार झाले होते.

रविवारची साधारण अकराची वेळ अवघडलेल्या वातावरणात मी शक्य तितका गंभीर चेहरा करून बसले होते.  माझ्या स्वभावाचा अगदी विरुद्ध असल्यामुळे मी कदाचित विचित्र सुद्धा दिसत असेल.  अतिशय औपचारिक प्रश्न उत्तर चालली होती.

तेवढ्यात कुठून तरी म्याव असा आवाज आला.  आणि पुढच्या क्षणी एक गुबगुबीत मांजर आलं.  आणि माझं पायाला स्वतःचा अंग घासायला लागलं.  त्याचबरोबर आपल्या लग्नासाठी पाहण्याचा कार्यक्रम आहे.  आपण जरी रीतीने वागलं पाहिजे.  वगैरे सगळं विसरून मी अगदी तालासुरात किंचाळले.  आणि झटकन पाय वरती सोफ्यावर घेऊन बसले. माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून मी होणाऱ्या सासूचे मोठे झालेले डोळे पाहिले.  अर्थात माझ्या अशा कृतीनंतर होकार आला.  तर सासूबाई पण माझ्या नाईलाज होता. 

त्या क्षणापर्यंत मला मांजराची प्रचंड भीती वाटत होती.  मुलाची काकू, मामी त्याचा एखादा मित्र मला बघायला आले असतील.  इतपत मला वाटलं होतं मांजर येऊ शकेल ही अपेक्षा मात्र नव्हती.  त्यांच्या घरात मांजरांच्या वावरत असतात.  हे ऐकून मला धडकी भरली होती.  इयत्ता यथावकाश उभयपक्षी होकार, आल्यावर ही गोष्ट आमच्या लग्नाची सुफळ संपूर्ण झाले.  आणि गेली 28 वर्ष आमची ही संसाररूपी गाडी सुसंवाद विसावा भ्रमनिरास अनपेक्षित अपेक्षापूर्ती अशा विविध जंक्शन्स वर्ड थांबवत सुखे नाही व मार्गक्रमणा करत आहे. 

 

 

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती