सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर!

डिजिटल पुणे    23-08-2024 12:50:54

पुणे : दरवर्षी वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. नुकतेच ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला ‘‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’’ घोषित करण्यात आले आहे.मयसभा करमणूक मंडळी, झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटात स्वप्नील जोशी,अनिता दाते, सुबोध भावे,शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत.

‘वाळवी’ हा शब्द तसा नकारार्थी! तरीही अशा नावाचा आपल्याला हसवणारा,मजेदार आणि आत्मपरीक्षण करणारा भन्नाट चित्रपट केवळ मराठीतच नाही तर इतर भाषांमध्येही त्याच्या अनोख्या विषयामुळे आणि मांडणीमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनाही तो आवडला होता.परेश मोकाशी नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण, विलक्षण गोष्टी,हटके कलीकृती घेऊन येतात, त्यातील वाळवी हे एक उदाहरण आहे.मराठीतील पहिला थ्रिलकॅाम असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला.

झी स्टुडिओजचे सीबीओ उमेश कृष्ण (कुमार) बन्सल म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी चौकटीबाहेरचे घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील असते. परेश मोकाशी अत्यंत अभ्यासू आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत, जे प्रेक्षकांच्या आवडी उत्तमरित्या जाणतात. आज ‘वाळवी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ही सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. ‘वाळवी’मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी हा एक सन्मान आहे.” दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात, ” खूप आनंद आहे, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो आमच्या संपूर्ण टीमचा आहे. मी प्रेक्षकांचाही तितकाच ऋणी आहे.”

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात,“आनंदाची गोष्ट आहे, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही तर आमच्या संपूर्ण टीमचा आहे.मी प्रेक्षकांचा तितकाच ऋणी आहे.”


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती