सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

राज ठाकरेंच्या बायोपिकमध्ये दिसणार 'हा' रांगडा अभिनेता, १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपट

डिजिटल पुणे    05-09-2024 18:45:06

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवे प्रयोग घडत आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून हटके आणि वेगळे विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेण्याचे स्वप्न पाहणारा चित्रपट म्हणून आगामी ‘येक नंबर’कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या दसऱ्याला प्रदर्शित होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरनेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. नवोदित अभिनेता धैर्य घोलप याच्या करारी नजरेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर, या पोस्टरवर राज ठाकरे यांची झलक देखील पाहायला मिळाली आहे.

या चित्रपटाचे शूटींग मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून सुरू करण्यात आले होते. या चित्रपटात गुढी पाडवा मेळावा, राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत घेतलेल्या बैठका यांचेही चित्रकरण करण्यात आले असून राज ठाकरे स्वत: या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय राज ठाकरेंची भूमिका साकारणारा एक अभिनेताही असून तो कोण आहे याचे अद्याप गूढ उकललेले नाही.

दसऱ्याचे औचित्य साधून 'येक नंबर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाशी इतके दिग्गज जोडले गेले आहेत की, चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली. प्रेक्षकांना या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचे समोर आले आहे.

१० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपट

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला ह्या 'येक नंबर' चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभलं आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती