सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

कु. समृद्धी मलिकार्जून स्वामी हिला जंगम समाज चॅरीटेबल ट्रस्ट जि. लातूरच्या वतीने शालेय शिक्षणासाठी 15000/- रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली

डिजिटल पुणे    12-07-2024 11:37:25

लातूर : जंगम समाज चॅरीटेबल ट्रस्ट जि. लातूर यांच्या वतीने कु. समृद्धी मलिकार्जून स्वामी ही रीलायन्स कॉलेज लातूर इथे 12वी सायन्स करत होती.  पण तिची आर्थिक परस्थिती बिकट असल्यामुळे तिला शिक्षण साठी अडचण येत होती. त्यांनी ट्रस्ट अध्यक्ष श्री. बंडू स्वामी   यांच्याशी संपर्क केले व तात्काळ बंडू स्वामी यांनी ट्रस्ट च्या सर्व संचालक मंडळापुढे हा विषय मांडला. 

 त्यास संचालक मंडळाने तातडीने मंजुरी देऊन त्या होतकूर विध्यार्थीनीला 15000/- रुपयांची मदत देण्यात आली. मदत देते वेळेस आदरनिय डॉ. काळगे साहेब, श्री. बंडू स्वामी, श्री. विजयकुमार स्वामी बडूरकर, श्री. संजय स्वामी पानचिंचोलीकर, यांच्या उपस्थितीत त्या मुलीला व तीच्या आई यांचे कडे सुपूर्द केले.  या साठी श्री. विजय कुमार अण्णा स्वामी हुंडेकरी, श्री. सूर्यकांत अण्णा पत्रे निलंगा, डॉ. श्री. संजय स्वामी साहेब चाकूर, श्री. शिवानंद स्वामी सर, श्री. प्रा. संजय स्वामी बोरीकर, श्री. वैजनाथ स्वामी फायनस, श्री. नूर नदया कन्नडे सर,यांनी पण सहकार्य केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती