सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

शाळेतील कामगारांना चारित्र्य पडताळणीचे आदेश

डिजिटल पुणे    06-09-2024 10:59:25

पुणे :  बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. त्यानुसार कोणत्याही शाळेत कर्मचारी नेमताना आधी त्यांची चारित्र्य पडताळणी पोलिस विभागाकडून करणे अनिवार्य असेल, प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही असणे बंधनकारक राहील. 

शाळेजवळ पोलीस चौकीमध्ये ही पडताळणी सध्या सुरू आहे. शाळेतील रिक्षावाले काका, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी मावशी यांचेही पडताळणी होत आहे. बदलापूर घटनेनंतर सर्वत्रच ही पडताळणी सक्तीची करण्यात आली आहे. 

सीसीटीव्हीत आक्षेपार्ह वर्तन आढळल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करण्याची जबाबदारी शाळेचे व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर असेल.या बाबत हलगर्जीपण्णा केला तर कारवाई केली जाईल हे सीसीटीव्ही चालू आहेत की नाही याची तपासणी, कंट्रोल रुम, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, फुटेजमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल.  

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती