*रा.स्व.संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात विजयादशमी पथसंचलने उत्साहात*
* ठिकठिकाणी नागरिकांतर्फे उस्फूर्त भव्य स्वागत* विविध मान्यवरांनी उपस्थिती
पिंपरी चिंचवड दि.१२ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
शिस्तबध्दरित्या ओळीत चालणारे एकसारख्या संघ गणवेशातील दंडधारी स्वयंसेवक, लयबद्ध रचना सादर करीत संपूर्ण वातावरण भारावून टाकणारे घोषपथक आणि मध्यभागी डौलात फडकणारा भगवा ध्वज अन् त्यावर नागरिकांकडून होत असलेली पुष्पवृष्टी स्वागत! निमित्त होते पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी पथसंचलनाचे.
राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्याने शहरात शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २६ ठिकाणी देहूरोड आकुर्डी, रावेत,हिंजवडी पूनावळे, वाकड थेरगाव, चिंचवड पूर्व - पश्चिम, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, आळंदी, मोशी, संभाजी नगर, चिखली,आळंदी, निगडी या भागात सकाळी तर देहू,संत तुकाराम नगर, दिघी, चऱ्होली ,भोसरी, इंद्रायणी नगर भागात सायंकाळी नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न होत आहेत. घोषाच्या तालावर हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन सामूहिकतेचे दर्शन घडविले.विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी विविध भागातील संचलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फूर्तपणे पुष्पवृष्टी , भारत माता की जय च्या जयघोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भव्य स्वागत केले.
-------------------------------------------------