सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वॉचमनसहित सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

डिजिटल पुणे    18-06-2024 11:30:03

पुणे : घोले रस्त्यावरील जे पी त्रिवेदी मेमोरियल ट्रस्टच्या मुलांच्या वसतिगृहात असलेल्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना १५ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास करून शिवाजीनगर पोलिसांनी जे पी त्रिवेदी मेमोरियल ट्रस्टच्या रेक्टर, वॉचमन, सर्व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अजय अशोक मीरांडे (वय १९, रा. वैष्णवी बंगला, धनाजी नगर, अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी जे पी त्रिवेदी मेमोरियल ट्रस्टच्या रेक्टर अंजना केतन मोतीवाला, ट्रस्टचा वॉचमन सुभाष सुर्वे, ट्रस्टचे या घटनेला जबाबदार असलेले सर्व पदाधिकारी आणि अन्य यांच्या विरोधात भारतीय दंडविधान ३०४ (अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक मदनलाल मिरांडे (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. अजय हा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे या ठिकाणी दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अजय हा जे पी त्रिवेदी मेमोरियल ट्रस्ट यांच्या घोले रस्त्यावरील मुलांच्या वसतिगृहात चौथ्या मजल्यावर असलेल्या ४०२ क्रमांकाच्या रूममध्ये राहण्यास होता.

या वसतिगृहातील लिफ्ट १५ मार्च रोजी संध्याकाळी जात असताना ही लिफ्ट अचानक बंद पडली. लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आरोपींनी योग्य पद्धतीचा वापर केला नाही. या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना त्या संदर्भात आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेल्या नव्हत्या. वॉचमन सुर्वे आणि अन्य हजर असलेल्या लोकांमार्फत वसतिगृहातील बंद पडलेल्या लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही योग्य खबरदारी घेण्यात आली नव्हती. अजय याला लिफ्ट अर्धवट उघडून त्यामधून खाली उडी मारण्यास सांगण्यात आले. बाहेर येण्यासाठी अजय याने आरोपींच्या सांगण्यानुसार लिफ्ट मधून बाहेर उडी मारली. मात्र, तो लिफ्टच्या डक्ट मध्ये खाली पडला. त्याच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर इजा झाली आणि त्यामध्येच तो मरण पावला.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास करण्यात आला. तसेच, प्रत्यक्षदर्शींचे आणि आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये आरोपी हे अजयच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती