सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

धक्कादायक! पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह; पुण्यातील घटनेनं खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

डिजिटल पुणे    20-06-2024 17:45:27

पुणे : पुण्याच्या फुरसुंगी भागात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याच्या टँकर मध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घरातून बेपत्त झालेली ही महिला फुरसुंगी जवळ एका पॉवर हाऊसला पाणी देताना टँकर मध्ये असल्याची बाब समोर आली. दरम्यान महिलेचा मृतदेह थेट पाण्याच्या टँकर मध्ये आढळल्याने अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे. सध्या पोलिसांकडून ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचवण्याकरिता टँकर गेला होता. त्यावेळी पाईप पाण्याच्या टाकीत सोडण्यात आला. मात्र पाणी काही आले नाही. त्यावेळी वॉल्व्ह चेक करून देखील पाणी आले नाही. त्यानंतर पाईप काढून पाहिल्यावर आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर चालकाने टँकरचे झाकण उघडून पाहिल्यावर आतमध्ये एक महिलेचा मृतदेह आढळून आला. 

कौशल्या मुकेश चव्हाण असं सदर मृत महिलेचं नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात हि महिला हरवल्याची तक्रार यापूर्वीच दाखल करण्यात आली होती. पोलिस या महिलेचा शोध घेत होते. मात्र आता तिचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच याबाबत वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. या महिलेची हत्या करण्यात आली आहे कि तिने स्वतःच आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती