सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

आंतरराष्ट्रीय योग दिन -२०२४ निमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे पंतप्रधानांनी उपस्थितांना केले संबोधित;योग फक्त विद्या नाही, विज्ञान आहे- पंतप्रधान मोदी

डिजिटल पुणे    21-06-2024 13:15:23

श्रीनगर : भारतासह संपूर्ण जगात आज जागतिक योग दिवस साजरा केला जाता आहे.२०१५ नंतर आजचा हा १० वा जागतिक योग दिवस आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. या ठिकाणी त्यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत योगाभ्यास केला. दरम्यान, उपस्थितांना संबोधताना, योग फक्त विद्या नाही तर विज्ञान आहे, मानवी मेंदूसाठी योग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दरम्यान, काश्मीरच्या भूमीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना १० व्या जागतिक योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

श्रीनगरमधील SKICC च्या पटांगणात हा कार्यक्रम आज सकाळी ६.३० पासून सुरू होणार होता, परंतु पावसामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. SKICC च्या सभागृहात हा कार्यक्रम होत आहे.

यावेळी पुढे बोलताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीर ९ योग साधनेची भूमी आहे. योगाचा हा अविरत प्रवास सुरु आहे. जगातील अनेक देशात ९ योग दिनचर्येचा भाग बनतोय. सौदी अरेबियात योगाचा एज्युकेशन सिस्टिममध्ये समावेश करण्यात आला, असून ही अभिमानाची बाब आहे. जगातील नेते आता योगावर बोलत आहेत. ऐवढेच नाही तर जगात योगावर रिसर्च सुरु आहे. योगामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहे. भारताने २०१४ साली संयुक्त राष्ट्रात जागतिक योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या या प्रस्तावाच १७७ देशांनी समर्थन केलं. हा एक विक्रम असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

योग दिवस भारतासाठी अभिमानाची बाब - योगी आदित्यनाथ

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील जागतिक योग दिवसानिमिचत्त योगाभ्यास केला. एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, १० व्या जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, ही संधी आम्हाला देशाचे पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे, ज्यांच्या प्रयत्नांचे आणि दूरदृष्टीचे हे फळ आहे. जगातील जवळपास दोनशे देश ९ योग परंपरेशी जुळत आहे. भारताच्या संस्कृतीचा आणि परंपरेसाठी ही अभिमानाची बाब आहे. हा आपल्या पूर्वजांचा आणि परंपरेचा मोठा आदर आहे.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती