सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

पुणे ड्रग्ज प्रकरण: नामाकिंत हॉटेलच्या वॉशरूममध्ये तरुणीचं ड्रग्जचं सेवन;व्हिडीओ होतोय व्हायरल....

डिजिटल पुणे    25-06-2024 18:11:28

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटना त्यानंतर ड्रग्जच्या जाळ्यातही पुण्याची तरूणाई अडकल्याचं दिसत आहे. पुण्यातील नामांकित हॉटेलमधील अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत असताना अशातच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरूणी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये असल्याचं दिसत आहेत

 या व्हिडीओमुळे पु्ण्यामध्ये ड्रग्जचंही जाळं पसरल्याचं आता समोर येत आहे.पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, हे प्रकरण चर्चेत असताना आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये दोन तरूणी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्जचं सेवन करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ (विमाननगर) पुणे-नगर रस्त्यावरील हॉटेल मधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यातील ड्रग्जचं जाळं वाढत आहे या व्हिडीओवरून दिसत आहे. सध्या पोलीस या व्हिडीओचा तपास करत असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आरोपींवर अद्याप अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदायतील कलमांनुसार कारवाई केलेली नाही. ⁠तपास सुरु आहे. व्हीडीओ L3 मधीलच आहे का? कधीचा आहे? अंमलीपदार्थाचा वापर झाला आहे का? हे तपासात समोर येईल. त्यानंतर आरोपींविरोधातील कलमांमध्ये वाढ करण्यात येईल. व्हायरल झालेल्या सर्व व्हिडीओची तपासणी सुरु आहे.व्हिडीओ मध्ये दिसणार्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस उपायुक्त यांनी दिली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती