सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात!! १८ जणांचा जागीच मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी!

डिजिटल पुणे    10-07-2024 18:31:19

उत्तरप्रदेश :  देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की,उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये झालेल्या भीषण अपघातानं देश पुरता हादरला आहे.  बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी ओव्हरटेकच्या नादात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल १८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या वेळी डबल डेकर बस बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले होती. प्रवासावेळी ही बस उन्नावच्या सीमाभागात येताच तीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नमध्ये दूध टँकरला जाऊन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बस थेट टँकरला कापत पुढे गेली. यामुळे ट्रॅक्टरचे आणि बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये तब्बल १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सर्व जखमी रुग्णालयात दाखल 

लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गढा गावासमोर हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेनंतर सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून कांहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

उन्नावचे पोलिस अधीक्षक, क्षेत्र अधिकारी बांगरमाऊ आणि इतर पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. बसचा क्रमांक UP95 T ४७२०असून दुधानं भरलेल्या कंटेनरचा क्रमांक UP70 CT ३९९९ आहे. मृतांमध्ये १४जणांची ओळख पटली आहे. तर, इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.         


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती