सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; शिरूर तालुक्यातील घटना,आरोपी बापाला अटक

डिजिटल पुणे    29-08-2024 14:51:52

शिरूर : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे जन्मदात्या पित्याने स्वतः च्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका ३५ वर्षीय नराधम बापाने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा दुर्दैवी प्रकार मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितल्यानंतर उघडकिस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या मैत्रीनीने हा प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत नराधम बापाला अटक केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वशिम येथील एक कुटुंब कारेगाव येथे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते. पिडीत मुलीचा बाप हा बाहेरख्याली असल्यामुळे त्याची पत्नी तीन वर्षांपुर्वी आपल्या दोन मुलांना टाकुन निघुन गेली. त्यानंतर बापाने काही दिवसांपुर्वी दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. 

परंतु आठ दिवसांपुर्वी आरोपीच्या वागण्याला कंटाळून ती महिला निघुन गेली.त्यानंतर या नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या अकरा वर्षीय मुलीसोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले. त्याच्या यातना सहन न झाल्याने मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितले. त्यानंतर त्याने शेजारील व्यक्तीच्या मोबाईलवरुन आपल्या सख्या आईला फोन करुन सगळी हकीगत सांगितली. त्यानंतर तिने कारेगाव येथील आपल्या मैत्रिणीला तातडीने फोन करुन घटनेची माहिती दिली.

त्यानंतर तिच्या मैत्रिणीने लगेचच पीडित मुलीच्या घरी धाव घेतली आणि तिथली परिस्थिती पाहुन रांजणगाव पोलिसांशी संपर्क साधला. रांजणगाव पोलिसांनी आधी त्या पिडीत मुलीला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय उपचारासाठी आधी शिरुर आणि त्यानंतर पुणे येथील शासकीय रुग्णालयात नेले. पिडीत मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे.रांजणगाव पोलिसांनी नराधम बापाला पुणे येथील विशेष न्यायालयात हजर केले असता आरोपीला आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती