सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 जिल्हा

अखेर स्मशानभूमीची लोकसहभागातून स्वच्छता ; राष्ट्रवादी काँग्रेस भिगवण स्टेशनचा पुढाकार, स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक

डिजिटल पुणे    06-09-2024 18:13:46

भिगवन :  भिगवन स्टेशन येथील स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य तसेच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली होती अंतिम विधीसाठी लोकांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्णतः झुडपे आल्याने रस्त्याने जाताना अडथळा येत होता. मुख्य स्मशानभूमी जागेत अवास्तव वाढलेल्या रानटी झुडपांमुळे हा भाग अडचणींचा बनला होता ,या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना कोणत्याही प्रकारचे यश मिळाले नाही त्यानंतर अखेर भिगवण स्टेशन येथील स्मशानभूमी स्वच्छता मोहिम ग्रामस्थांनी पूर्णत्वास नेली. या स्वच्छता मोहीम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिगवन स्टेशन मधील प्रमुख पदाधिकारी होते.सुमारे वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाचे सर्व भिगवण स्टेशन करांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
 
  भिगवन चे माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामहरी चोपडे, राहुल चोपडे, राकेश खटके,अनिल खंडागळे सागर सूर्यवंशी, नूर मोहम्मद शेख,रोहित मिसाळ बबलू जाडकर,सुरज पोंदकुले,नंदू देवकाते अभिजीत घायाळ,अनिकेत भिसे, मयूर शेंडगे,पिनू पांढरेयांच्यासह अनेकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सुमारे अडीच तास चाललेल्या या मोहिमेत झाडाझुडपांनी अडवलेला रस्ता पूर्णतः साफ करण्याबरोबरच स्मशानभूमी परिसरातील रानटी झुडपे तोडून हा भाग स्वच्छ करण्यात आला.
 
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती