पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कायम गजबजलेल्या कोथरूड स्टँडजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. कोथरूड धोंडीबा सुतार बस स्थानक येथे भीषण अपघात झाला.या धडकेनंतर तरूणीच्या डोक्यावरून डम्परचे चाक गेल्याने तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यावर तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. यामध्ये युवतीचा मृत्यू झाली माहिती समोर येत आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेली मुलगी मुळची अमरावती येथील आहे. कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी मिक्सर डंपर समोर आल्याने ती चाकाखाली गेली. या घटनेत मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मिक्सर चालक यांनी या घटनेनंतर तिथून पळ काढला आहे. या घटनेचा अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.
आरती सुरेश मनवाणी (वय, २३ रा. एरंडे होस्टेल भेलके नगर) कोथरूडमध्ये वसतिगृहात राहत होती कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत असताना डम्परची धडक लागून जागीचमृत्यू झाला आहे. तिचे वडील सुरेश मनवाणी यांना कळवले असून पोलिसांनी डम्पर ताब्यात घेतला आहे.