उरण : भेंडखळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील महिलांना आरी वर्क प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शितल घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला.त्या प्रशिक्षणासाठी गावातील महिला बचत गटच्या महिला ,गावातील काही शिकाऊ महिला यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. या कार्यक्रम साठी ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजीता पाटील, उपसरपंच अभिजीत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर, अजित ठाकूर,लिलेश्वर भगत, ग्रामपंचायत सदस्या प्राची ठाकूर,सोनाली ठाकूर,संगीता भगत, शितल ठाकूर,स्वाती पाटील,स्वाती घरत,अक्षता ठाकूर, ग्राम विकास अधिकारी किरण केणी यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांनी प्रस्तावना करताना महिलांनी पूर्ण प्रशिक्षण केल्यावर प्रशिक्षणाचा चांगला फायदा होईल असे सांगितले. सरपंच मंजिता पाटील व इतर सदस्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पहिली प्रशिक्षण बॅच सोमवार दिनांक १४/१०/२०२४ पासून सुरू होत आहे. प्रशिक्षण कालावधी पंधरा दिवसाचा आहे.तरी होतकरू महिलांनी या प्रशिक्षणाचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा,प्रशिक्षणात मोठया प्रमाणात महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन भेंडखळ ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.