सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

उरण मध्ये एनएमएमटी चालू करण्याची मागणी

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    09-10-2024 18:18:02

उरण : अनेक महिण्यापासून उरण मध्ये एनएमएमटीची सेवा बंद आहे त्यामुळे नवी मुंबई मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, आबालवृद्धाना मोठया संकटाना सामोरे जावे लागत आहे. एनएमएमटी बस सेवा बंद झाल्याने खाजगी वाहना तर्फे लुटालूट चालू आहे. शिवाय वेळ व श्रम अधिक खर्च होत आहे. नागरिकांना कामावर तसेच कामावरून घरी पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे उरण शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच मॉर्निंग कट्टाचे पदाधिकारी व उरणचे जेष्ठ नागरिक या सर्वांनी मंगळवारी  महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेउन त्यांना उरण मध्ये एनएमएमटी चालू करण्याची मागणी केली.

एनएमएमटीची बस सेवा चालू व्हावी या संदर्भात निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात उरणच्या ३०० नागरिकांनी सह्यांची मोहीम करून पाठिंबा दर्शविला .सदर निवेदन स्वीकारून प्रवाशांच्या समस्या लक्षात घेउन नवी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त कैलास शिंदे यांनी लवकरत लवकर एनएमएमटीची बस सेवा  चालू होईल असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. सदर निवेदन देताना उरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,अभय वेद पाठक, माजी नगरसेविका आफशा मुकारी  ,अकबर नदाफ, चंदा मेवती, मोहनसिंग खरवड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती