सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • मनसे ची ४५ उमेदवाराची यादी जाहीर पुण्यातून ३ उमेदवार कोथरूड : किशोर शिंदे हडपसर. : साईनाथ बाबर खडकवासला : मयुरेश वांजळे
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • दीपक नागपुरे खडकवासल्यांमधून इच्छुक देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
  • आदित्य ठाकरे 24 तारखेला अर्ज दाखल करणार
  • बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई होणार
  • हडपसर सोलापूर मार्गावर गाडीमध्ये 22 लाख रुपये सापडले
 जिल्हा

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था आणि मित्र परिवार सारडेच्या वतीने महिला भगिनींना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!

डिजिटल पुणे    22-10-2024 16:51:23

उरण : निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी आपलं अनमोल योगदान देणारी आणि  सामाजिक दायित्व जपणारी संस्था म्हणुन सुपरिचित असणारी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था ही सामाजिक कार्यात देखील आपला वेगळा ठसा उमटवून समाजात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे.आणि तेच सामाजिक दायित्व जपत संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण  राजू मुंबईकर  यांच्या माध्यमातुन आणि मित्र परिवार सारडेच्या सहकार्यातून एक सुंदर कार्य साकारलं गेलं ते सारडे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते  संपेश पाटील यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून  सारडे गावातील महिलां भगिनींना नामांकित डाबर कंपनीचे रिअल फ्रेश फ्रूट ज्युस,डाबर टूथपेस्ट,मिक्स मसाला,गुलाबजल,जास्मिन रूम फ्रेशनर, हजमोला मुखवास अश्या प्रकारच्या तब्बल २३० पाकिटं,जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोबतच कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती संपेश पाटील यांचे कार्यक्रमा दरम्यान महिलां भगिनींनी औक्षण करून आणि केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला.

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था आणि मित्र परिवार  सारडे यांच्या माध्यामातून संपेश पाटील यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत साकारलेल्या या आदर्शवत कार्यक्रमा करिता  केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,आगरी,कोळी,कराडी संघर्ष संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत,आंतरराष्ट्रीय कराटे कोच गोपाळ म्हात्रे , राजेश पाटील, सुभाष पाटील,ज्योत्स्ना पाटील, अल्पेश जोशी, त्रिजन पाटील आणि सारडे गावातील महिलां भगिनींचा उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती