सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

डिजिटल पुणे    06-11-2024 16:01:41

अमेरिका : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय स्पष्ट झाला असून, ते पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत, असे फॉक्स न्यूजने जाहीर केले आहे. रिपब्लिकन पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, कमला हॅरिस यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ट्रम्प यांनी निर्णायक सात स्विंग स्टेट्समध्ये विजय मिळवला, ज्यामुळे 277 इलेक्टोरल कॉलेज मतांचा टप्पा पार केला. कमला हॅरिस 226 मतांवर स्थिरावल्या आहेत. या विजयाने जागतिक स्तरावर चर्चेचा विषय निर्माण केला असून, ट्रम्प यांचे आगामी धोरण अमेरिकेतील परिवर्तन घडवू शकते.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे निवडणूक निकाल समोर आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष बनले आहेत.त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा एकदा अमेरिकेचं अध्यक्षपद मिळवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २७० चा बहुमताचा आकडा पार करत हा विजय मिळवला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्याविरोधात विजय मिळवला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “हा आमच्यासाठी एक शानदार विजय आहे ज्यामुळे आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू.

ट्रम्प अमेरिकन संसदेवरही कब्जा करू शकतात

अमेरिकन संसदेची दोन्ही सभागृहे, सिनेट आणि प्रतिनिधीगृह, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात जाऊ शकतात. अशा परिस्थितीत ट्रम्प निवडणूक जिंकले तर त्यांना काम करणे खूप सोपे होईल. महाभियोग, परकीय करारांना मान्यता देण्यासारखे महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्याचा अधिकार सिनेट नेत्यांना आहे. अमेरिकेत, नेते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऐवजी सिनेटचा भाग असणे पसंत करतात. अमेरिकेत एखाद्या नेत्याच्या सिनेटचा सदस्य होण्यामागील कारण या पदाच्या सामर्थ्याशी संबंधित आहे. सिनेटर 6 वर्षांसाठी निवडले जातात. तर प्रतिनिधीगृहातील नेते केवळ दोन वर्षांसाठी निवडले जातात. महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार सिनेटला आहे. मात्र, सरकार चालवण्यात दोन्ही सभागृहांची समान भूमिका आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणतेही विधेयक बहुमताने मंजूर केले जाऊ शकते.

 


 तुमची प्रतिक्रिया



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती