नवी दिल्ली : भारतात दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो. देशातील वाढत्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत जागरूकता वाढवणे तसेच प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार यासाठीची पावले उचलण्यास प्रेरित करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस अधिकृतपणे साजरा करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. किरणोत्सरांचा शोध लावणाऱ्या आणि ज्यांच्या कार्याचा कर्करोगाच्या उपचारांवर सखोल परिणाम झाला आह अशा, नोबेल पारितोषिक विजेत्या मादाम मेरी क्युरी यांचा जन्मदिवस म्हणूनच केवळ ही तारीख निवडली गेली नाही, तर सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य म्हणून कर्करोगाला संबोधित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब देखील आहे.
मुख्यत्वे जीवनशैलीतील बदल, तंबाखूचा वापर, वाईट आहाराच्या सवयी आणि कमी शारीरिक हालचाल या मुख्य कारणांमुळे 1.4 अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. एका अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे 800,000 नवीन कर्करोगाची नवी प्रकरणे नोंदविली जातात. तंबाखू-संबंधित कर्करोग रुग्णांपैकी पुरुषांचे प्रमाण 35-50% आणि स्त्रियांचे प्रमाण 17% इतके आहे.तथापि,विविध प्रकारचे कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय योजून टाळता येण्याजोगे आहेत, तसे25 व्यापक जागरूकता आणि वेळेवर हस्तक्षेप करून, भारत कर्करोगाचा भार लक्षणीयरीत्या कमी करत आहे.
भारत आज राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस साजरा करीत आहे. कर्करोगाचा प्रतिबंध, लवकर निदान, परवडणारे उपचार आणि उपशामक काळजी यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कर्करोगाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे, भारताने सार्वजनिक शिक्षण, आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि संशोधनात आपले प्रयत्न वाढवत राहणे आवश्यक आहे. यासाठी शाश्वत गुंतवणूक, सरकारी आणि खाजगी क्षेत्रांमधील सहकार्य तसेच देशभरातील कर्करोगाच्या उपचारातील असमानता कमी करण्यासाठी वचनबद्धतेची आवश्यकता असेल. प्राथमिक आरोग्य सेवा, निदान करू शिकतील अशी शिबिरे, तंबाखू नियंत्रण आणि परवडणारे उपचार यावर सरकारचे लक्ष, हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कर्करोगाला प्राधान्य देऊन आणि तो रोखण्यासाठी, निदान करण्यासाठी आणि प्रभावीपणे उपचार करण्यासाठी धोरणे अंमलात आणून, भारत कर्करोगाचा भार लक्षणीयरीत्या कमी करू शकतो तसेच या आजाराने बाधित लाखो लोकांचे जीवन सुधारू शकतो.