उरण : उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे लढाऊ युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांना उरण तालुक्यातील चाणजे,नवघर,जासई व कोप्रोली या चारही मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळणार आहे. त्यासाठी या परिसरातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढ झाली आहे. यात उरण तालुक्यातील तरुण सक्रिय झाले आहेत. आता आम्हाला आमच्या हक्काचा भूमिपुत्रांना न्याय देणारा प्रीतमदादाच्या रूपाने आमदार हवा आहे. आशा प्रतिक्रिया तरुणांकडून व्यक्त केली जात आहे.
उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटातील अनेक गावातून तरुण आणि युवा मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील चित्रच बदलल आहे. समाजात सर्वसामान्य नागरिकांना सर्वतोपरी सदैव सहकार्य करण्यासाठी तत्पर असलेले प्रीतमदादा यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याने भारावून शेकडो तरुण गावोगावातील प्रचारात सक्रिय झाले आहेत. आजपर्यंत त्यांनी वैयक्तिक ५००० पेक्षा जास्त कुटुंबाला रोजगार दिला आहे. त्या उलट विरोधकांनी आता पर्यंत नुसत्या आश्वासन आणि घोषणाना आपण भूललो आहोत. यापुढे भुलणार नाही. संपूर्ण युवाशक्ती दादांच्या पाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून दादांचे काम तळागाळात पोहोचवणार.
यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणणार आणि तरुणांचे आदर्श प्रीतमदादा म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करून आमचा भूमिपुत्रांचा हक्काचा रोजगाराची समस्या सोडवणारा आमदार निवडून आणणार असा निर्धार उरण मधील तरुणांनी केला आहे.