उरण : उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पहिली पालखी म्हणून श्री साई सेवा मंडळाची दिंडी सुपरिचित आहे.सालाबादप्रमाणे या वर्षीही श्री साई सेवा मंडळ उरण विभाग यांच्यावतीने उरण ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाचे पदयात्रेचे हे २४ वे वर्षे आहे.श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त श्री साईबाबांच्या भव्य पालखी, वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्तमंदीर देऊळवाडी-उरण येथून गुरवार , दि.५/१२/२०२४ रोजी सकाळी ६.३० वा. श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डी येथे प्रस्थान होणार असून श्रींची पालखी शुक्रवार , दि. १३/१२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. श्री क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचेल.गुरवार दि. ५/१२/२०२४ रोजी सकाळी ६ ते ६:३० वा. श्रींची पालखी व पादुका साईभक्त भाविकांच्या दर्शनासाठी देऊळवाडीतील श्री दत्तमंदीरामध्ये ठेवण्यात येणार आहेत. दरवर्षी पहिल्या दिवशी हनुमान कोळीवाडा येथील साई भक्तांतर्फे सुंदर अशी पालखी सजविली जाते.पालखीचे दर्शन घेण्यासाठी तरी साईभक्त भाविकांनी श्रींच्या पालखीचा व पादुकांच्या दर्शनाचा आवश्य लाभ घ्यावा.तसेच बाबांच्या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये सामील न होणाऱ्या साईभक्त भाविकांनी पालखी दिंडी सोबत पाच पाऊले चालण्यासाठी व पायी चालत जात असलेल्या पदयात्री साईभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी हजर राहून श्री साईंचा कृपा आशिर्वाद घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
पहाटे ५ वा. आरती, पूजन व भजन,५:१५ वा. ॐ श्री साईनाथाय नम: या मंत्राचा जप व पुढे मार्गस्य प्रस्थान, दुपारी १२ वा. मध्यान्ह आरती,दुपारी १२:३० श्री साई सच्चरित्राचे, सामुदायिक साप्ताहिक पारायण तसेच साईस्तवन मंजुरी वाचन, दुपारी ३:३० वा पुढील मुक्कामाकडे प्रस्थान,ॐ श्री साईनाथाय नमः मंत्रांचा जप, सायंकाळी ६.१५ धुपारती असे दैनंदिन कार्यक्रम असून पालखी दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ श्री साई भंडारा व श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार, दि. २१/१२/२०२४ रोजी श्री रत्नेश्वरी मंदीर, मु. जसखार येथे संपन्न होणार आहे.दिंडीत चालत जाणाऱ्या साई भक्तांचे पदयात्री फॉर्म भरण्यासाठी बोकडविरा बस स्टॉप जवळ, किरीट पाटील यांच्या कार्यालयात मंडळाचे तात्पुरते कार्यालय चालू केले आहे. त्याच ठिकाणी पदयात्रीचे फॉर्म भरले जातील याची पदयात्री साई भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी
अध्यक्ष संदीप पाटील -9920548181,
उपाध्यक्ष अजित पाटील -9322888505,
कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील -8879614920,
उपाध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे -7039104237,
उपाध्यक्ष जगदीश कडू-
9004344182
सेक्रेटरी सुनिल पाटील – 9664165877
यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.