सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 राज्य

आंबिल ओढा पूरप्रश्नावर चंद्रकांतदादा पाटील यांनीच काढला तोडगा*

MSK    12-11-2024 14:00:50

*आंबिल ओढा पूरप्रश्नावर चंद्रकांतदादा पाटील यांनीच काढला तोडगा*

२०१९च्या पावसाळ्याने पुणेकरांच्या मनात भीतीचे घर केले. कारण मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि ओढ्याच्या पाण्याने अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. सोसायट्यांच्या सिमाभिंती कोसळल्या, परिसरात खूप नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतरही संभाव्य धोका कायमच होता, त्यामुळे नाल्यांच्या सीमाभिंती महत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.

महापालिकेने पूरप्रवण भागात काही ठिकाणी भिंती बांधल्या आणि पूरनियंत्रणासाठी पूलही उभारले. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी हे काम अपूर्ण राहिले. याच मुद्द्यावर कोथरूडसह इतर पूरप्रवण नाल्यांना सीमाभिंत बांधण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठपुरावा केला. ्

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांनी या प्रश्नाला कायमस्वरूपी उत्तर मिळाले. २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रकल्प मार्गी लावण्यात आला. नाल्याच्या पुरामुळे निर्माण होणारा धोका कमी झाला. पुणेकरांची दीर्घकाळची समस्या सोडवण्यात चंद्रकांतदादांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
हरकचंद जैन
 13-11-2024 18:12:45

काय तोडगा काढला पूर स्थीति कायम आहे जो पर्यंत नदी नाल्यातील अतिक्रमण हटवत नाही डी पी प्रमाणे खोली रूंदी करत नाही तो प्रयंत समस्या कायम राहणार aapn पुण्याचे पालक मंत्री असताना रस्ते फुटपाथ वरील किती अतिक्रमणे हटवली ह्याची माहिती द्यावी

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती