उरण : उरण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या नाकर्तेपणामुळे तालुक्याचा विकास रखडला असून या तालुक्याला पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मतदाराचा विश्वास सार्थ ठरवू असे प्रतिपादन प्रितम जे एम म्हाञे यानी केले. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ पागोटे येथे प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी बंडाशेठ, जितेंद्र म्हात्रे, रमाकांत म्हाञे, शिपाजी काळे, महेश साळुंखे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रितमदादा म्हात्रे म्हणाले की पागोटे क्रातीवीरांची भुमी आहे, माञ या भुमीतील नागरीकाना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्याचे आमदार यांचे या समस्याकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षात ते इकडे फिरकले देखील नाहीत. यानंतर आता निवडणुक समोर दिसताच त्यानी थापा मारण्यास सुरूवात केली आहे. ते रस्त्याबद्दल बोलत नाहीत, पाण्या बद्दल बोलत नाहीत. येथील आगरी, कोळी समाजाच्या समस्याबद्दल बोलत नाहीत तर अटल सेतू बद्दल बोलतात. आगरी, कोळी, समाजाचा अवमान होईल असे बोलत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिट्टी या चिन्हापुढील बटण दाबून मला विजयी करावे असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले आहे. उरणमध्ये प्रीतम म्हात्रेंचे पारडे जड, विकास कामे करण्यात महेश बालदी कमी पडल्याची उरणकरांमध्ये भावना उरण विधानसभा मतदार संघात करोडो रुपयांची कामे केल्याचा दावा करणारे उरण मतदार संघांचे आमदार महेश बालदी विकासाच्या फक्त गप्पा करत असून, विकास कामं करण्यात आ. बालदी हे कमी पडल्याची भावना उरणकरांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रीतम जे एम म्हात्रे यांचे पारडे निवडणुकीत जड झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला उरणकर मतदार पुन्हा संधी देत नसल्याचा इतिहास आहे. भाजपा महायुती तर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले आमदार महेश बालदी यांची निवडणूक रिंगणात उतरण्याची ही दुसरी वेळ आहे. माजी आमदार भोईर हे देखील निवडणूक लढवत आहेत. शेकापतर्फे निवडणूक लढवत असलेले प्रीतम जे एम म्हात्रे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असून आमदार महेश बालदी विकास कामं करण्यात कमी पडल्याने यंदा नव्या दमाच्या तरुण उमेदवाराला एकदा संधी देऊन पाहण्याच्या विचारात उरण मधील मतदारांमध्ये निर्माण झाले असल्याचे चित्र सध्या मतदार संघात पाहायला मिळत आहे. त्याचमुळे प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचाराला स्थानिक उरणकर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रीतम म्हात्रे करत असलेल्या प्रचारा दरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हात्रे यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसादाला पाहत प्रीतम म्हात्रे यांचा विजयाचा मार्ग सोप्पा असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
५० हजार रहिवाशांचे वास्तव्य असलेल्या व उरणकरांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या नौदलाच्या सेफ्टीझोन, जेएनपीएने विस्थापित केलेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. उरण परिसरात येऊ घातलेल्या नैना, अलिबाग-विरार कॉरिडॉर तिसरी मुंबई व इतर विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी शासनाने मोहीमच उघडली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात भूमिपुत्रांमध्ये संताप आहे. उरणमधील पायाभूत सुविधा, अपघात, वाहतूककोंडी, हॉस्पिटल, रस्ते यासाठी आंदोलने करण्यात आली. ही विकासकामे करण्यातही बालदी यांना अपयश आले असल्याचे दिसत आहे.
उरण एनएमएमटी बंदच
उरण मार्गांवर चालणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या बसने एका स्थानिकाला उडवल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने उरणमध्ये दिली जाणारी बस सेवा बंद केली आहे. यामुळे १० हजारापेक्षा जास्त प्रवाशांना याचा फटका बसला आहे. बंद झालेली ही सुविधा आमदार या नात्याने बालदी यांनी सुरु करणे अपेक्षित होते. मात्र बालदी यांना यात अपयश आले आहे.
आगरी समाजात नाराजी
प्रचारा दरम्यान आमदार बालदी हे स्थानिक भूमिपुत्र आगरी समाजाचा वारंवार अपमान करत आहेत. बालदी यांच्याकडून आगरी समाजाबद्दल केल्या जाणाऱ्या वक्तव्याविरोधात आगरी समाजात नाराजी पसरली आहे.