सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 जिल्हा

वीर वाजेकर महाविद्यालयात 'मतदार जागृती' विषयावर विशेष व्याख्यान.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    13-11-2024 17:59:54

उरण : दिनांक-१३ नोव्हेंबर २०२४ रोजी १९०-उरण विधानसभा मतदार  संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृती अभियान या विषयावर व्याखान झाले.नरेश मोकाशी, स्वीय पथक अधिकारी म्हणून उपस्थित होते.मोकाशी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मतदान हक्कांविषयी मार्गदर्शन केले.रुपेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून आजचा तरुण आणि त्याचा मतदान हक्क,मतदान हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार असून त्याने तो बजावला पाहिजे असे सांगितले .निर्मला मच्छीन्द्रनाथ घरत यांनी मतदार सेल्फी विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्र. प्राचार्य,डॉ.आमोद ठक्कर यांनी आजच्या तरुणांनी मतदानाविषयी सजग व जागरूक राहून आपला मतदानाचा हक्क बजवला पाहिजे,असे व्यक्त केले.

यावेळेस मी मतदान करणार म्हणून नव मतदारांच्या कडुन सह्यांची मोहीम राबविण्यात आली तसेच महाविद्यालयातील मतदार विद्यार्थ्यांचे सेल्फी घेऊन मतदान करण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.कार्यक्रमाचे आभार प्रा.राम गोसावी,राष्ट्रीय सेवा योजना चेअरमन यांनी मानले.यावेळी उपप्राचार्य डॉ.विलास महाले,प्रा.गजानन चव्हाण,प्रा.मयुरी मोहिते,प्रा.आचल बिनेदार, डॉ.झेलम झेंडे,डॉ.सुजाता पाटील उपस्थित होत्या.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती