उरण : येत्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचे पारडे जड होताना दिसत आहे. महेंद्र घरत हे गावोगावी बैठका घेवून मनोहर भोईर यांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करत आहेत.मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांनां ६८ हजार मतदान झाले होते. काँग्रेस पक्षाची ३५ हजार मते उरण विधानसभा क्षेत्रात आहेत. काँग्रेस पक्षाची मते ही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आघाडी धर्म पाळून मनोहर भोईर यांना मतदान करेल.
तसेच आगरी, कोळी, कराडी, बहुजन समाजाची मते सुद्धा महत्वाचा मुद्दा असून ही मते सुद्धा मनोहर भोईर यांना पडून गावागावात वाढता पाठिंबा पाहता मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचे मनोहर भोईर निवडून येतील असे बोलले जात आहे. महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देखील प्रचाराच्या कामाला लावले आहेत. मिलिंद पाडगावकर, नाना म्हात्रे, जे. डी. जोशी, महादेव कटेकर, महेंद्र ठाकूर, डॉ. मनीष पाटील, नंदराज मुंगाजी, विनोद म्हात्रे, कृष्णा पारंगे, किरीट पाटील, निखिल डवळे, वसंत काठावले, वसंत म्हात्रे, मार्तंड नाखवा, अखलाक शिलोत्री, गणेश सेवक, प्रकाश पाटील, भरत म्हात्रे, बाळकृष्ण म्हात्रे, संजय ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर,कुणाल घरत,रोहित घरत,असे असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महेंद्रशेठ घरत अध्यक्ष असलेल्या कामगार संघटनेचे वैभव पाटील हे आपले सहकारी मुरलीधर ठाकूर,लंकेश ठाकूर, भरत गायकवाड, चंद्रकांत ठाकूर,आदित्य घरत, आनंद ठाकूर,अंगत ठाकूर, राजेश ठाकूर, विवेक म्हात्रे, योगेश रसाळ, राजेंद्र भगत यांच्यासोबत कामगारांच्या भेटी घेवून जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्यासोबत प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे मनोहर भोईर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.