उरण : महाविकास आघाडी इंडिया, अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ १५ नोव्हेंबर रोजी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान, उरण येथे सायंकाळी ६ ते १० या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये माजी आमदार भाई जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे. या सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आले आहे.
उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. प्रीतम म्हात्रे यांना गावागावातून, शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उरण शहराचा विकास हवा असेल तर प्रीतम म्हात्रे यांना निवडून देणे गरजेचे आहे. प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातून, बीजेपीतून शेतकरी कामगार पक्षात पक्ष प्रवेश केला जात आहे. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे. शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरण प्राथमिक मराठी शाळेसमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार भाई जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे. येथील आमदाराने कोणतीही विकासाची कामे न केल्याने उरणचा मतदार, नागरिक उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.