सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 राज्य

INDGenius व सजग रहो आयोजित कार्यक्रम - *युवा - विकसित भारताचे शक्तिकेंद्र* आविनाश धर्माधिकारी यांच्या व्याखानातील महत्वाचे मुद्दे

MSK    14-11-2024 21:28:55

INDGenius व सजग रहो आयोजित कार्यक्रम -  *युवा - विकसित भारताचे शक्तिकेंद्र*

आविनाश धर्माधिकारी यांच्या व्याखानातील महत्वाचे मुद्दे

आज गुरूवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पिंपरी चिंचवड मधील ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाला शेकडो युवा वर्ग उपस्थित होता. धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे प्रमुख मुद्दे -*

-  समान नागरी कायदा - देश भक्तीची लिटमस टेस्ट आहे

- समान नागरी कायद्यामुळे संविधान व राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळणार आहे.

- समाजवादाच्या नावाखाली हिंदू विरोधी ढोंगी बडबड आताचे काँग्रेस नेते करतात त्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे.

- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कलम ३७० ला तीव्र विरोध केला होता.

- या कलमाचे ड्राफ्टींग देखील त्यांनी केले नाही, ज्या दिवशी नेहरूंच्या नेतृत्वात हे सादर झाले त्या दिवशी विरोध म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुपस्थित राहिले.

- मोदी सरकारने हे कलम परास्त केले आहे.

- युवकांनी हे समजवून घेऊन संविधान अभ्यासले पाहिजे

- काही नेते फक्त ढोंग करून संविधान दाखवत फिरतात पण संविधनिक गोष्टी करत नाहीत ही शोकांतिका आहे.

- राहुल गांधींना संविधान शिकवण्याची गरज आहे.

- राहुल गांधी देशाबाहेर जाऊन संविधान तत्व विरोधी बोलून भारतात संविधान दाखवून रक्षणाचे ढोंग करतात हे तुम्ही युवकांनी लक्षात घ्यावे.

- महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असून तुम्ही युवा पिढी या राज्याला पर्यायाने देशाला बळकट करणारे नेतृत्व आहात

- येत्या २० तारखेला विधानसभा निवडणुकीत देशहित ओळखून सुट्टी साजरी न करता हिंदुत्वासाठी, संविधान रक्षणासाठी, ढोंगी काँग्रेसी नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन केले.

- हिंदुत्व टिकले तरच हा देश व संविधान रक्षण होऊ शकणार आहे.

- देश संविधान से चलेगा, शरिया से नहीं


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती