वाशी : देशभरातील २० राज्यातील कुशल कारागिरांनी बनविलेल्या हस्तनिर्मित सिल्क कपडे, साड्या, शाली यांचे प्रदर्शन असणारे 'सिल्क विव्ह्ज ' हे प्रदर्शन दि.२३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर (वाशी,नवी मुंबई) येथे आयोजित केले जाणार आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असेल. लग्नसराईनिमित्त या विशेष प्रदर्शनात सिल्क, लिनन, कॉटन आणि उत्सवी पारंपारिक परिधानांचे प्रदर्शन होणार आहे. साड्या, ड्रेस, सूट, कुर्ते, शाली आणि हस्तनिर्मित कपडे प्रदर्शित केले जातील. विविध हस्तकला उत्पादने देखील एकाच छताखाली उपलब्ध असतील. भारताच्या विविध राज्यांतून आणलेल्या रेशीम आणि कॉटनचे ७० पेक्षा अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असतील..प्रवेश विनामूल्य आहे.