सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 जिल्हा

हिंगोली: वसमत विधानसभेचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांवर हल्ला

डिजिटल पुणे    20-11-2024 17:13:29

हिंगोली :  वसमत विधानसभेचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली असून यामध्ये गुरुपादेश्वर शिवाचार्यमहाराज हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड या ठिकाणी उपचार सुरू आहेत. वसमत तालुक्यातील गिरगांवकडे जात असताना गिरगांव फाटा या ठिकाणी त्यांच्या वाहनावर अज्ञाताने दगडफेक केली असता यामध्ये वसमत विधानसभेचे उमेदवार गूरूपादेश्वर शिवाचार्य महाराज गंभीर जखमी झाले आहेत.

वसमत विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उभे असलेले गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या गाडीवर वसमत मालेगाव रस्त्यावरील गिरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवार ता.१९ रात्री १० च्या सुमारास अज्ञातांनी अचानक दगडफेक केली.यात गाडीच्या काचा फुटून गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज जखमी झाले आहेत. हल्लेखर अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. जखमी गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांना वसमत येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंत त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे.

सोमवारी वसमत मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज रात्री गिरगाव कडे निघाले होते. दरम्यान त्यांची गाडी गिरगाव पाटीवरुन गिरगावच्या दिशेने निघाली असता काही अंतरावर त्यांच्या गाडीवर अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक केली.

यात गाडीच्या काचा फुटून आतमध्ये बसलेल्या गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या डोक्याला व कानाला दगड लागून  जबर जखमी झाले आहेत. हल्लेखोर मात्र अंधाराचा फायद घेऊन पसार झाले. जखमी गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांना वसमत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती कळताच नागरीकांनी महाराजांना पाहण्यासाठी गर्दी केली.डोक्याला गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती