सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 जिल्हा

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचा 38 वा गळीत हंगाम व सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ संपन्न

डिजिटल पुणे    21-11-2024 17:20:17

लातूर  : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ मधील गळीत हंगाम व नव्याने उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच सदर प्रसंगी कारखाना मालकीच्या दोन हार्वेस्टर चे (ऊस तोडणी यंत्राचे) पूजन करण्यात आले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याने मागील गाळप हंगामामध्ये आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन व संकल्पनेने जवळपास 97 टक्के ऊसतोड हार्वेस्टर द्वारे करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये हार्वेस्टर द्वारे ऊस तोडणी करण्याचा मांजरा पॅटर्न निर्माण केला आहे. त्याबाबत देशभरामध्ये आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी निर्माण केलेल्या या मांजरा पॅटर्नचे कौतुक होत आहे. कारखान्याकडे या अगोदर पाच हार्वेस्टर आहेत त्यामध्ये आणखीन दोन हार्वेस्टरची भर पडली आहे.तत्पूर्वी कारखान्याचे संचालक श्री कैलास पाटील यांनी सपत्नीक श्री मांजरेश्वर हनुमान अभिषेक , गव्हाण पूजन व सत्यनारायण पूजन केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे,जागृती शुगरचे व्हा. चेअरमन लक्ष्मणराव मोरे, संत शिरोमणी चे चेअरमन शाम भोसले,व्हा.चेअरमन  सचिन पाटील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ, मांजरा परिवारातील कारखान्यांचे कार्यकारी संचालक आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख  म्हणाले की, मांजरा परिवाराने काळाची गरज ओळखून नेहमीच विविध प्रकल्प कार्यान्वित करून शेतकऱ्यांना हेवा  वाटेल असे कार्य केले आहे.  सहकार क्षेत्राचे पवित्र जपत असताना शेतकरी सभासदांचा कारखान्यांवर असलेला विश्वास कायम ठेवण्याचे काम आजपर्यंत केले व यापुढे देखील केले जाईल असे सांगून गळीत हंगाम २०२४-२५ साठी सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

योग्य नियोजनातून यशस्वी वाटचाल

- आमदार धिरज विलासराव देशमुख

 नवनवीन प्रकल्प उभारत असताना मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या योग्य आर्थिक नियोजनातून स्वच्छ व पारदर्शक कारभार आजपर्यंत केला व पुढे देखील केले जाईल तसेच कारखाना संचालक मंडळाने सातत्याने काटकसरीचे धोरण अवलंबून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर देण्याचे काम मांजरा परिवाराने सातत्याने केले आहे. भविष्यात  आपला शेतकरी हा  केवळ साखर उत्पादक न राहता तो इंधन निर्मिती करणारा शेतकरी अशी त्यांची ओळख आपणास  निर्माण करावयाची आहे. असे सांगून त्यांनी गळीत हंगामाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास शेतकरी,खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती