उरण : NPT मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे GTI (APMT) या बंदरामध्ये काम करणारे RTGC ऑपरेटर्स हे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शिवतेज संघटनेचे सभासद आहेत. या कामगारांचा पगारवाढीचा करार बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होता. दोन्ही संघटनांचे नेत्यांनी संयुक्तिक चर्चा करून दिनांक २७ नोव्हेंबर रोजी पगारवाढीचा करार करण्यात आला. या पगारवाढीच्या करारनाम्यानुसार प्रत्येक कामगाराला तिन वर्षासाठी १९००० रुपये पगारवाढ,इंसेन्टीव्हमधे ५०%वाढ,एक ग्रॉस पगार ± २१००० बोनस, ३,५०,००० रुपयांची मेडीक्लेम पॉलीसी आई -वडिलांसहीत, फेस्टिवल ऍडव्हान्स ३०,००० रुपये, लाईफ इन्शुरन्स तिस लाख, निवृत्ती वय ५८ वरून ६० वर्ष, आठ महिन्याचा वाढीव पगाराचा फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या करारनाम्याप्रसंगी न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत,कार्याध्यक्ष पी. के. रमण, शिवतेज संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार मनोहरशेठ भोईर, फ्युचर्झ स्टाफिंग सोलुशन चे डायरेक्टर चिराग जागड, एच.आर. मॅनेजर हृदयनाथ कांबळे कामगार प्रतिनिधी आदिनाथ भोईर, मंगेश पाटील, सुरेश पाटील, विक्रांत ठाकूर, सुदिन चिखलेकर, भालचंद्र म्हात्रे, अरुण कोळी, भूपेंद्र भोईर, अशोक म्हात्रे, निलेश पाटील, तुषार घरत, दर्शन घरत आदी उपस्थित होते.पगारवाढीच्या करारनाम्यामुळे कामगारांचे पगार एक लाख रुपयांच्या वर गेलेले आहेत त्यामुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे.