नवी दिल्ली : पुणे आणि पुण्याशी संबंधित विविध विषयांसंदर्भात नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे आणि सूचना-प्रसारण मंत्री मा.श्री. अश्विनी वैष्णव जी यांची पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेत चर्चा केली.
बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली…
१. पुणे आकाशवाणीचे प्रसारण मुंबईऐवजी पुणे केंद्रावरूनच व्हावे आणि पुण्यासाठी ‘रेन्बो’ रेडिओ चॅनेल सुरु करावे.
२. पुणे आकाशवाणीत अद्ययावत सामग्री उपलब्ध व्हावी आणि कार्यक्रम विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात.
३. पुणे-दिल्ली दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरु व्हावी.
४. पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर या दरम्यान ‘वंदे भारत’ तरतूद व्हावी.
५. पुणे दूरदर्शन केंद्र अद्ययावत व्हावे.
६. पुणे ते जोधपुर (राजस्थान) दरम्यान सुरु असलेल्या रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढावी.
वरील सर्व विषयांवरील चर्चेअंती मा. वैष्णव जी यांनी विषयांच्या पूर्ततेसाठी योग्य ते निर्देश दिले आहेत.
तसेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे निभावल्याबद्दल वैष्णव यांचे मोहोळ यांनी अभिनंदन केले.