सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 राज्य

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा आज महाराष्ट्र दौरा;केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

डिजिटल पुणे    03-12-2024 10:37:17

नवी दिल्ली  : उपराष्ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार असून, मुंबई येथे विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये कृषी तज्ज्ञ, संशोधक, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती